मनसेच्या इशाऱ्यानंतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरूच

 मनसेला फेरीवाले व प्रशासन गांभीर्याने घेईना

डोंबिवली / शंकर जाधव : '१५ दिवसात स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त हवा अन्यथा खळयखट्याक' असा इशारा मनसेने दिला आहे. इशारा देऊन दोन दिवस उलटले तरी फेरीवाले आणि पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण हटाव पथकाने गंभीर्यने घेतलेले दिसत नाही. नेहमीच दिखाव्याची कारवाई करून एका दिवसाचे कौतुक झाले. मात्र पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांनी स्टेशनबाहेर आपले बस्तान बांधले.आत मनसे यावर काय भूमिका घेईल हे लवकरच दिसेल. 

   टाळेबंदी उठल्यावर स्टेशन बाहेरील परिसर अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापण्यास सुरुवात केली. फुटपाथवरील दुकानदारांचे अतिक्रमण सुरूच आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण हटाव पथकाने दोन दिवसांपासून दिख्याव्याची कारवाई करताना दिसतात. मात्र पुन्हा फेरीवाले आपले समान घेऊन बसत असल्याने पालिकेच्या कारवाईला काहीही अर्थ नाही असे डोंबिवलीकरांनी म्हणणे आहे.

   मनसेच्या इशाऱ्याला अनधिकृत फेरीवाल्यांनी मनावर घेतले नसल्याचे दिसते. प्रशासनाही पथकप्रमुख व कर्मचाऱ्यांना करावाई करण्याचे निर्देश देऊन गप्प बसताना दिसतात.'ग' आणि 'फ' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्तांनी काही दिवसात स्टेशन परिसर पहिला नसल्याने कर्मचारी दिख्याव्याची कारवाई करून मोकळे झाले. डोंबिवली पूर्वेकडील मधूबन - पूजा गल्ली, उर्सेकर वाडी, रामनगर तिकीट घरासमोर, जुनी वृद्धावन हॉटेल इमारतसमोर येथे फेरीवाल्यांची जागा ठरलेली आहे. स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाल्यांची जागा हक्काची झाली असून नागरिकांशी हुज्जत घातली जाते.

  मनसेचा इशारा हा प्रशासनासाठी गंभीर विषय असतानाही दोन दिवस उलटूनही स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त होत नसल्याने डोंबिवलीकरांनी आश्चर्य व्यक्त होत आहे.

फेरीवाल्यांनी अडवली रुग्णवाहिकेची वाट

      डोंबिवली पूर्वेकडील मधूबन- पूजा गल्लीत गुरुवारी सकाळच्या सुमारास रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास अडचण येत होती. येथील फेरीवाल्याला रुग्णवाहिका चालकाने माल बाजूला काढण्यास सांगितले असता फेरीवाल्याने हुज्जत घातली.या घटना पाहताना नागरिकांनी गर्दी केली होती.अखेर काही वेळाने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास वाट करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post