माजी सभापतीचे पालिका आयुक्तांना पत्र
डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीजवळील दावडी गावात माजी सभापती रेखा जनार्दन म्हात्रे यांच्या मालकीची जागा सर्वे नंबर १२२ आणि ३८/३ येथे अनधिकृत बांधकाम सुरु आहे.अरुण मोतीराम यादव आणि उमेश कनोजिया या दोघांनी बिनदास्तपणे शासकीय नियमांचे उल्लंघन करून सदर अनधिकृत बांधकाम केल्याचे माजी सभापती रेखा म्हात्रे यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.पालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन सदर ठिकाणचे बांधकाम जमीनदोस्त करावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
माजी सभापती म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे कि, त्याच्या मालकीची जागा सर्वे नंबर १२२ आणि ३८/३ येथे सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाला स्थानिक कोणाचा तरी पाठिंबा असून ते बांधकाम लवकरात लवकर तोडावे.पालिका आयुक्तांनी सदर ठिकाणी सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करावी व येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी सभापती रेखा म्हात्रे यांनी केली आहे.माजी सभापती म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे सात बारा उतारा आणि बांधकामाचा फोटो आयुक्तांना दिला आहे.