सामान्य माणसांनाही करता येणार राजेशाही डेस्टिनेशन वेडिंग

 


राजस्थान, मुघल आणि इंडो-वेस्टर्न थीमचा एकाच ठिकाणी समावेश 

महाराष्ट्र : लग्न म्हटलं की स्वप्नवत दुनियेची मागणी अलिकडे रूजली आहे. अशा डेस्टिनेशन वेडिंग करणा-यांसाठी आत्ता "मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब” सर्वोत्तम पर्याय आला आहे. एकाच छताखाली लग्नासाठी आवश्यक असलेल्या सर्व राजेशाही आणि मॉर्डन यांचा सुंदर मेळ घालणा-या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. देशातील सर्वात विस्तीर्ण आणि सामान्यांना परवडणारे डेस्टिनेशन आता छ.संभाजीनगर मध्ये उपलब्ध होत आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात तब्बल तीन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत असलेल्या गादिया ग्रुपने शेकडो गृहनिर्माण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यांनी आजवर हजारो लोकांना सदनिकांचा ताबा दिला आहे. गेल्या ३१ वर्षांच्या विश्वासार्हतेच्या बळावर आता गादिया ग्रुपने छ.संभाजीनगर ‘वेडिंग डेस्टिनेशन क्लब’ म्हणजेच “मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब” विवाह सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

"मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब" हा मौजेपुरी, धोरेगाव, गंगापूर तालुका, मराठवाडा येथील  पहिला वेडिंग डेस्टिनेशन क्लब आहे. तब्बल २२ एकर क्षेत्रावर पसरलेला हा भव्य रॉयल प्रकल्प आहे. छ.संभाजीनगर- नगर-पुणे महामार्गापासून फक्त ३ कि.मी अंतरावर आणि छ.संभाजीनगर शहारापासून 28 कि.मी अंतरावर आहे. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लबमध्ये ३ वेडिंग लॉन असून त्यात राजस्थान थीम, मुघल थीम आणि इंडो-वेस्टर्न थीमचा समावेश आहे.

मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लबमध्ये आलिशान १६० कॉटेज-रूम्स, ३ मोठे लॉन, ३ बँक्वेट हॉल, परिक्रमा-एम्फीथिएटर, कार्निव्हल, फोटोशूट गार्डन, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, रेस्टॉरंट आणि मुलांसाठी खेळाचे उद्यान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


"मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब"ची वैशिष्ट्ये...

• मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लबच्या सदस्यत्वाच्या कालावधीत एक मोठा कार्यक्रम किंवा लग्न

(२ दिवसांसाठी १ लॉन, १ बँक्वेट हॉल आणि  ४० कॉटेज/रूम्स)

• दरवर्षी २ दिवस आणि २ रात्री १५ वर्षे मोफत मुक्काम

• क्लब हाऊस, रेस्टॉरंट आणि मुलांच्या खेळाचे क्षेत्र आणि इतर क्रीडा सुविधांसाठी 15 वर्षांचे सदस्यत्व

• सदस्यत्व अंतर्गत समाविष्ट सदस्य - पती, पत्नी आणि २ मुले

• तुमचे सदस्यत्व तुम्ही कोणाला हस्तांतर करू शकता , विकू शकता किंवा कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

• सदस्यत्वाला निवास आणि जेवणावर विशेष सवलत मिळेल.

• सदस्यत्वामध्ये केटरिंगची रक्कम समाविष्ट नाही, परंतु वाजवी किमतीत दर्जेदार केटरिंग उपलब्ध केले जाईल.

• इतर सर्व कार्यक्रम संबंधित अतिरिक्त आवश्यक बाबी एका छताखाली अतिरिक्त खर्चावर प्रदान केल्या जातील

• फक्त शुद्ध शाकाहारी जेवण उपलब्ध.

• अधिक माहितीसाठी संपर्क करा : ७० ९१९४ ९१९४

    साइटसाठी मौजे पुरी, धोरेगाव, ता. गंगापूर, जि. छ.संभाजीनगर (एमएस) – 431133.

• आमची वेबसाईट - www.mangalamweddingdestination.com

Post a Comment

Previous Post Next Post