स्लॅब कोसळत असल्याने रहिवाशांना इमारतीबाहेर kadhle6
डोंबिवली / शंकर जाधव : लोढा हेवन परिसरातील शांती उपवन सोसायटीच्या इमारतीचे काही ठिकाणीचे स्लॅब (माती) कोसळत असल्याचे सोसायटीतील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने रहिवाशांनी संपूर्ण वसाहत तातडीने खाली करण्यात आली आहे.शिवाय कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडू नये या दृष्टीने महापालिका प्रशासन तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी सदर ठिकाणी दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.प्रसंगी सोसायटीच्या रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था व जेवणाची (खानपान) व्यवस्था करण्यासाठी प्रशासनास किंवा लोढा हेवन परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीला येण्यासाठी गरज भासणार आहे.
अशा कठीण प्रसंगी आपण शहरातील नागरिक म्हणून आपण त्यांच्या मदतीला पुढे यायला हवे असे काँग्रेस पदाधिकारी श्यामराव यादव यांनी सांगितले.