डोंबिवलीत एमआयडीसी विभागात वासुदेवाच्या गाण्याने पूर्वीची सकाळ आठवली.
'वासुदेव आलो हो वासुदेव आला , सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला ' हे मराठी चित्रपट 'देवता' मधील प्रसिद्ध गीत. अगदी 25 ते 30 वर्षांपूर्वी वासुदेव' च्या गीताने सकाळी होत होती. सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट आणि वसुदेवाचे घराच्या अंगणात देशन यानेच सकाळ होत होती. आता धावपळीच्या जीवनात याची जागा संगणक आणि मोबाईलने घेतली असली तरी आजही वासुदेव पाहण्याची उत्सुकता आहेच.
गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी विभागात सकाळ वासुदेव आल्याचे पाहताच समाजसेवक मुकेश पांडे यांना त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. वासुदेव गात असलेले गीतही पांडे यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले.
शंकर जाधव
डोंबिवली फास्ट
Tags
लोकवाणी
