डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या जिल्हास्तरीय तरणतलाव स्पर्धेत
दिवा/ आरती मुळीक परब: नुकत्याच डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या 24 व्या ॲक्वाटिक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी विशेष कामगिरी करीत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच जलतरणपटूंनी बक्षीसांची लयलूट केली.
या स्पर्धेत आठ वर्षाखालील वयोगटात ओजस मोरे याने १ सुवर्ण १ रौप्य व 2 कांस्य, नक्ष निसार याने 1 रौप्य 1 कांस्य, नायरा कौशल हिने 5 कांस्य, माही जांभळे हिने 4 सुवर्ण 1 रौप्य आणि वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकाविली.
10 वर्षाखालील वयोगटात निधी सामंत हिने 6 सुवर्णपदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप प्राप्त केली. फ्रेया शाह हिने 1 सुवर्ण 3 रौप्य 1 कांस्य, श्रुती जांभळे हिने 1 सुवर्ण, किमया गायकवाड 1 सुवर्ण, रुद्र निसार १ कांस्य, मोहित देशपांडे 1 कांस्य,
12 वर्षाखालील वयोगटात आयुषी आखाडे 4 रौप्य,परीन पाटील 1 रौप्य, सोहम पाटील 1 रौप्य, शर्वण पेठे १ रौप्य, सोहम साळुंखे 1 रौप्य 2 कांस्य, स्नेहा लोकरे 1 कांस्यपदक पटकाविले.
50 वर्षाखालील गटात कविता शहा यांनी 1 सुवर्ण 1 रौप्य, तर 50 वर्षावरील गटात प्रशांत साळुंखे यांनी 2 सुवर्णपदक प्राप्त केली. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक नीलकंठ आखाडे, कैलास आखाडे, अतुल पुरंदरे, रुपेश घाग यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत आहेत. या सर्व जलतरणपटूंचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी सर्वांचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
क्रीडा