डोंबिवली / शंकर जाधव : जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला आघाडी डोंबिवलीच्या वतीने डोंबिवलीतील महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. डोंबिवली पत्रकार कक्षात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिला पत्रकारांच्या कामाचे कौतुक केले. तर महिला पत्रकारांनी भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
मयुरी चव्हाण-काकडे, भाग्यश्री प्रधान-आचार्य, शर्मिला वाळूंज आणि जान्हवी मोर्ये महिला पत्रकारांचा भाजप महीला आघाडी डोंबिवलीच्यावतीने गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मनिषा छल्लारे, स्मिता कवडे, वर्षा परमार, निलिमा चव्हाण, सायली सावंत, माधवी दामले, भारती ताम्हणकर,हेमलता संत, वंदना आठवले, रंजना डोंगरे,स्मिता जोशी, मीना अहिरे,प्रियंका खानोलकर, माधुरी मडके, दमयंती भानुशाली,माधुरी भिडे, संगीता भावसार आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होत्या.
समाजिक प्रश्नाबरोबर महिलाच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या महिला पत्रकारांचा सन्मान भाजपा नेहमीच करत असते असे यावेळी महिला कार्यकर्त्यांनी सांगितले. तर पत्रकार भाग्यश्री प्रधान-आचार्य यांनी भाजपचे आभार मनात आज सर्व स्तरावर महिला आपले नाव करत असल्याचे सांगितले.