डोंबिवलीतील १०१ वर्षाच्या आजीचे निधन

 


  डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीत मिलापनगर मध्ये राहणाऱ्या श्रीमती रुक्मिणी अनंत प्रभुदेसाई यांचे  गुरुवारी सकाळी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 101 वर्षे होते. नुकताच 3 मार्च रोजी त्यांच्या वयाला 101 वर्षे पूर्ण झाल्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपर्यंत त्या स्वतःचे स्वतः काम करीत होत्या. घरचे जेवण करताना त्या सूना/नात सुनांना मदत करीत असत. त्यांनी लेकिपासून नातवंडांपर्यंत अनेक बाळंतपणे केली आहेत. त्यांची स्मरणशक्ती या वयातही चांगली होती. निवडणुकीत त्या आवडीने मतदानाला जाऊन आपला हक्क बजावत  होते. नुकत्याच त्या काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीकडे बँगलोर येथे वास्तव्यास गेल्या होत्या. तेथेच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले व तेथेच त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा पश्चात  दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, खापर पतवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post