डोंबिवलीत राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणणार

 


  •  फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करणार
  •  मनसे आमदार , पालिका आयुक्त आणि फेरीवाला संघटनेची बैठक पार 

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त होण्यासाठी मनसेने 15 दिवासाची डेडलाईन दिली होती.मात्र फेरीवाले अतिक्रमण करत असल्याने मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी स्टेशन परिसराचा पाहणी दौरा केला.त्यावेळी फेरीवाला संघटनेच्या अध्यक्षांनी पाटील यांची भेट घेऊन नोंदणीकृत फेरीवाल्यांना जागा ठरवून द्यावी अशी विनंती केली. मनसे आमदार पाटील यांनी नोंदणीकृत फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले होते.पालिकेच्या मुख्यालयात मनसे आमदार पाटील, पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांडगे आणि फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. रेल्वे स्टेशन फेरीवाला मुक्त करणारे फेरीवाला धोरण महिन्याभरात निश्चित करत फेरीवाल्यांना हक्काच्या जागा ठरवून देण्याचे आश्वासन आजच्या बैठकीदरम्यान आमदार राजू पाटील यांना पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहे. 

     बैठकीत आयुक्तांनी पुढील महिन्याभरात फेरीवाला धोरण निश्चित करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. या बैठकीसाठी आमदार पाटील यांच्या समवेत रिक्षा संघटनाचे प्रतिनिधी, फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी, पालिका आयुक्त, फेरीवाला पथकातील अधिकारी, यांच्यासह वाहतूक विभाग आणि आरटीओचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर आमदार पाटील म्हणाले, स्टेशन परिसरातील १५० मीटरचा परिसर मोकळा ठेऊन इतर भागात धोरण निश्चित होईपर्यत फेरीवाल्यांना व्यवसाय करता येईल अशी अनुमती देण्यात आली. तर चिमणी गल्लीत बांधून तयार असलेले मात्र मागील ७ वर्षापासून धूळ खात पडलेले पार्किंग रिक्षासाठी देण्यात येणार आहे. तर डोंबिवली पूर्वेकडील मधल्या ब्रिज जवळ आणि राथ रोडवर मीटररिक्षा स्टॅन्ड सुरु केले जाणार असल्याचे देखील आयुक्तांनी यावेळी सांगितल्याचे आमदार म्हणाले. 

        महाराष्ट्र सरकारने स्थानिक जनतेसाठी सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेवर कर्नाटक सरकारने हरकत घेतल्याबाबत बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकार जर आपल्या लोकासाठी सुविधा देत असेल तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे कारण नाही. ती गावे महाराष्ट्रातील असल्याचे ते म्हणाले. तर फडतूस, काडतूस बाबत बोलताना त्यांनी सध्या केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असून त्यापेक्षा नागरिकाच्या समस्यांकडे लक्ष द्या त्या देखील महत्वाच्या असल्याचे ते म्हणाले. तर कोणाच्या मागे लागून आपली भाषा तशीच वापरावी त्याला काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

              फुटपाथ मोकळे होणार..

  डोंबिवली पूर्वेकडील दुकानदारांनी अतिक्रमण केलेले फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्याची मागणी आमदारांनी या बैठकीत केली. धोरण निश्चित झाल्यानंतर २०१४ मध्ये सर्व्हे झालेल्या ९५३१ फेरीवाल्याचा प्रश्न मार्गी लागण्या बरोबरच स्टेशन परिसर मोकळा होईल.



Post a Comment

Previous Post Next Post