डोंबिवलीत 'मन की बात'च्या १०० वा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी

 



पंतप्रधान मोदी डोंबिवलीकरांची स्तुती करतील

डोंबिवली :  शंकर जाधव / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' च्या १०० व्या कार्यक्रम देशभर पाहिला गेला.देशाच्या विकासाला हातभार लावत आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात देशाचे नाव उज्जल करणाऱ्या व्यक्तींना स्वतः मोदींनी फोन करून त्यांच्या कामाचे कौतुक केल्याचे कार्यक्रमात दाखविण्यात आले.डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी अश्या प्रकारे समाजसेवा करून देशाचे नाव उंचवावे असे केल्यास लवकरच पंतप्रधान मोदी यांचा डोंबिवलीकरांना फोन येईल आणि ते स्वतः डोंबिवलीकरांचे कौतुक करतील अशी अपेक्षा शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील आणि भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस सांगितले.

डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या कार्यालयासमोर नागरिकांनी 'मन की बात'कार्यक्रम पहिला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पाटील, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष परब, अध्यक्षा मनीषा राणे, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, परिवहन समितीचे माजी सदस्य संजय राणे यांसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखा ,केबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांचे डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौकातील जनसंपर्क कार्यालय येथेही डोंबिवलीकरांनी 'मन की बात' कार्यक्रम पहिला.कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांशी बोलताना पाटील आणि परब यांनी पंतप्रधान मोदींच्या देशकार्याबाबत माहिती दिली.देशातील अनेक नागरिकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करून देशाच्या विकासाला हातभार लावला.

डोंबिवलीकरांनी अश्या प्रकारे काम केल्यास एक ना एक दिवस स्वतः पंतप्रधान मोदी हे त्या व्यक्तीशी फोनवरून संवाद साधतील असा विश्वास व्यक्त केला.शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, डोंबिवली शहर पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, शिवसेना उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, शहर सचिव तथा डोंबिवली क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, शिवसेना कल्याण तालुका उपप्रमुख उमेश पाटील, डोंबिवली पूर्व मंडल उपाध्यक्ष राजू शेख, शिवसेना विभागप्रमुख अनिल म्हात्रे, शिवसेना शाखाप्रमुख धनाजी चौधरी, शिवसैनिक शैलेश चव्हाण तसेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या अनेक मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post