मनसेमुळे १६ व्या दिवशीही स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त.

 अतिक्रमण केल्यास फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल होणार

 डोंबिवली / शंकर जाधव :  डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे असा इशारा देत मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी १३ एप्रिल रोजी १५ दिवसांची डेडलाईन दिली होती.१५ दिवसांनंतर आमदार पाटील यांच्यासह मनसैनिकांनी स्टेशन परिसराची पाहणी केली.मनसेच्या इशाऱ्यानंतर बुधवारी १६ व्या दिवशीहि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे दिसते. फेरीवाला मुक्त स्टेशन परिसर दिसल्याने डोंबिवलीकरांनी मनसेचे आभार मानले आहे. तर स्टेशन परिसरात फेरीवाले दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सहायक आयुक्तांना  देणार आहेत.

  स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त संदर्भात डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी बुधवारी कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयात पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.यावेळी झालेल्या चचर्चेत शहरअध्यक्ष घरत यांनी डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे आणि फेरीवाल्यांवरील कारवाईत सातत्य ठेवा असे सांगितले. पालिका आयुक्तांनी कारवाई सुरूच राहणार असल्याचे घरत यांनी सांगितले.डोंबिवली स्टेशन परिसरात १५० मीटर पट्टे तात्काळ मारण्यात यावे,`ग`प्रभाग क्षेत्रातील फेरीवाला अतिक्रमण हटाव पथकातील मनुष्यबळ वाढविणे, शहर फेरीवाला समितीची बैठक तात्काळ घेण्यात यावी व फेरीवाल्यांना बसण्यास जागा निश्चित करण्यात यावी,पालिका आयुक्तांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी करावी, ना फेरीवाला क्षेत्रात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागण्या मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी केली


 डोंबिवलीकरांनी मानले मनसेचे आभार

      १३ एप्रिल रोजी मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी डोंबिवली स्टेशन फेरीवाला मुक्त झाला पाहिजे असा इशारा देत १५ दिवसांची डेडलाईन दिली होती.२८ तारखेला मनसे आमदार पाटील यांसह मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी स्टेशन परिसराची पाहणी केली होती.मनसेच्या इशाऱ्यानंतर स्टेशन परिसरात मनसेने` आता आमच्याकडे दुर्लक्ष करा` असा बॅनर लावला होता.स्टेशन परिसरात पालिकाप्रशासनाकडून फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असून १६ व्या दिवशी ही स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त दिल्याने नागरिकांनी आभार मानले.



फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई 

 पायी चालण्यासाठी असणार्या राखीव जागा म्हणजे फुटपाथ.मात्र दुकानदारांनी फुटपाथवर अतिक केल्याने नागरिकांनार रस्त्यावरून चालवे लागते. आता फुटपाथवरील अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करा अशी मागणी मनसेने केली आहे. त्यामुळे काही दिवसात स्टेशन परिसरातील फुटपाथ ही नागरिकांना चालण्यास मोकळे होणार आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post