वॉचमॅन नसणाऱ्या इमारतीत घरफोडी करणारा अटकेत

 

 डोंबिवली / शंकर जाधव :  आपले घर सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक इमारतीत वॉचमॅन ठेवणे गरजेचे आहे. मात्र वॉचमॅन नसलेल्या इमारतींवर चोरांची नजर असते, हे या घटनेवरून समोर आले आहे. एका चोरट्याने या इमारतीवर नजर ठेवून घरफोडी केली. पोलिसांनी ४८ तपास चोरट्याला बेड्या ठोकून अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोशन बाळ जाधव ( ३२ , रा. हनुमानमंदिराजवळ निळजेगाव, डोंबिवली पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे.६ तारखेला कल्याण येथील मोहने परिसरात रोशने घरफोडी करून ३५ तोळ्याचे सोने चोरी केल्याची घटना घडली होती. गेल्या महिनाभरात घरफोडीच्या अनेक घरफोडीच्या घटना घडल्याने खडक पाडा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.रोशन ज्या इमारतीत घरफोडी करायच्या त्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याने पोलीस तपासात अडचण येत होती.

पोलिसांनी इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.मात्र रोशन तोंडाला मास्क लावून घरफोडी करत असल्याने सीसीटीव्ही कॅमेरात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.पोलिसांनी तपासाची दिशा बदलत ८ तारखेला शहाड येथे सापळा रचला. रोशन शहाडला येताच पोलिसांनी त्याला पकडून अटक केली.रोशनला अटक केल्याने पोलिसांना एकूण ८ गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले आहे.  

     रोशनने मोहने, आंबिवली, टीटवाळा, शहापूर, परिसरात घरफोडी केल्याचे कल्याण परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले. अटक आरोपीकडून पोलिसांनी ४७ तोळे सोने. १ लाप्तोप , १ मोबाईल.. दोन घड्याळ असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त ( कल्याण विभाग ) उमेश माने पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, पोलीस निरीक्षक (प्रशासन) नंदकुमार कॅचे, तपास पथकाचे अधिकारी सपोनि अनिल गायकवाड, व तपास पथकाचे अंमलदार सहा.पो.उप निरी. मधुकर दाभाडे, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोलीस हवालदार अशोक पवार, नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजु लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, पोलीस नाईक, सुधीर पाटील, पोलीस शिपाई राहुल शिंदे, अनंत देसले, कुंदन भांबरे, अविनाश पाटील यांनी केली आहे.

Tag : डोंबिवली घरफोडी, पोलिसांचे यश, 48 तासात चोर अटकेत



Post a Comment

Previous Post Next Post