जय श्रीराम नावाचा जयघोष करत डोंबिवलीतून शिवसैनिक अयोध्येला रवाना

 


डोंबिवली / शंकर जाधव :  राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येला जाण्यासाठी निघाले असून डोंबिवलीतूनही असंख्य शिवसैनिक अयोध्येला निघाले. शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेत शहरप्रमुख राजेश मोरे, संजय पावशे, संतोष चव्हाण, सागर दुबे , अमोल पाटील, वैभव राणे, समीर कवडे, तुषार शिंदे,गजानन व्यापारी, सुदाम जाधव ,पांडुरंग चव्हाण यासह अनेक शिवसैनिक जमा झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
     डोंबिवली स्टेशनला जाताना शिवसैनिकांनी जय श्रीराम, प्रभू रामचंद्रजी की जय जयघोष करत केला.यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत.येत्या ९ तारखेला मुख्यमंत्री शिंदे हे शरयू नदीजवळ महाआरती करणार आहेत. त्यानंतर मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेणार आहोत.



Post a Comment

Previous Post Next Post