मुलांनी शिकायचे कसे पालकांचा प्रश्न
गैरसोयी तातडीने दूर करा- मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांचे महापालिकेला निवेदन
दिवा / आरत मुळीक परब : पश्चिमेकतील स्टेशनजवळ असणाऱ्या ठामपा शाळा क्रमांक ७९/९८ मध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या शाळेतील प्रसाधन गृहांची स्थिती ही अतिशय खराब असून विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. प्रसाधन गृहातील मलनिस्सारण व्यवस्था नीट नसल्याने शाळेतील प्रसाधन गृह अत्यंत गलिच्छ, पाणी साचलेले आहे. त्यामुळे संपूर्ण शाळेत त्याचा घाण वास पसरलेला आहे. ही परिस्थिती मुलांच्या आरोग्याला घातक ठरत असूनही त्याकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.
शाळेतील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असून त्याच परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात असल्याचे निदर्शनास आले. या फुटलेल्या काचांमुळे भविष्यात एखादा अपघात घडू शकतो. सोबतच बहुतांश वर्गातील वर्गातील फळे हे देखील फुटलेल्या अवस्थेत आहेत, ज्यामुळे शिक्षकांना मुलांना शिकवण्यात अडचणी येत आहेत. या सर्व विषयावर शाळेकडूनही प्रभाग समितीला पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण त्यावर अजूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

या शाळेची पटसंख्या चांगली असूनही, इथल्या शिक्षकांनी मुलांसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे शाळेने राष्ट्रीय आणि महापालिका स्तरावर पारितोषिकेही जिंकलेली आहेत. एका बाजूला सरकारी शाळांबाबत सर्व स्तरांवर अनास्था असताना येथील शिक्षकांनी मिळवलेले यश हे वाखाणण्याजोगे असून त्याला सरकारी पातळीवरून थोडासा पाठिंबा मिळाल्यास शिक्षकांच्या प्रयत्नांना अजून बळ मिळेल असे मनसेच्या तुषार पाटील यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
Tags
महाराष्ट्र