दिव्यातच सुप्रसिध्द मटका बिर्याणीचा आस्वाद

दिवा / आरती मुळीक परब:  दिव्यात मुंबईतील सुप्रसिध्द असलेली मटका बिर्याणी शॉपचे शानदार उद्घाटन नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आता दिवेकरांना व्हेज व नॉन व्हेज बिर्याणीचा स्वाद दिव्यात चाखता येणार आहे. तसेच यांची खासियत म्हणजे सर्वच पदार्थ येथे मातीच्या भांड्यातच ग्राहकांना देणार आहोत त्यामुळे पदार्थाची चव तीच राहणार आहे, असे जयेंद्र भगत यांनी स्पष्ट केले.

चरणदास म्हात्रे आणि योगेश प्रभाकर भगत यांनी देखील यावेळी सर्व नागरिकांना आवाहन केले की एकदा तरी आमच्या या सुप्रसिध्द मटका बिर्याणीचा आस्वाद घ्यावा. 

Tag : नगरसेवक शैलेश पाटील , मटका बिर्याणी , दिवा, चरणदास म्हात्रे

Post a Comment

Previous Post Next Post