राष्ट्रीय बेंच प्रेस, डेडलिफ्ट पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत डोंबिवलीतील स्पर्धकांचा सुयश

 


 डोंबिवली /  शंकर जाधव : हरियाना येथील सोनीपत मधील ॲटलास्ट रोडवरील कम्युनिटी सेंटर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस व डेडलिफ्ट पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत स्पर्धेत पंजाब, हरियाना, दिल्ली, हिमाचल,जम्मू- काश्मीर,राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील १४२ स्पर्धांनी भाग घेतला होता. स्पर्धेत महाराष्ट्रातील २० स्पर्धकांनी भाग घेतला होता.या स्पर्धकांनी ३८ पदके आणि १ स्टाॅगमॅन पदक पटकाविले. 

   या स्पर्धेत डोंबिवलीचे समीर जोगळेकर यांनी ६७.५ वजनी गटात मास्टर-२ मध्ये बेंच प्रेस मध्ये ७७.५ वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले व डेडलिफ्ट मध्ये१५२.५ किलो वजन उचलून सुर्वण पदक पटकाविले.डोंबिवलीतील रजत तैमल यांनी ७५ सिनियर वजनी गटात बेंच प्रेस मध्ये ९५ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकाविले. व डेडलिफ्ट मध्ये १९५ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकाविले. या शहरातील सुयश वाळूंज यांनी ८२ ज्युनिअर वजनी गटात वेंच प्रेस मध्ये १२५ किलो वजन उचलून सुर्वण पदक पटकाविले व डेडलिफ्ट मध्ये २०२.५ किलो वजन उचलून सुर्वण पदक पटकाविले. प्रणव कुकीयन यांनी ६७.५ वजनी गटात बेंच प्रेस मध्ये ९५ किलो वजन उचलून सुर्वण पदक मिळविले.

शहापूरमधील मदन बड्डवाल यांनी ९० ज्युनिअर वजनी गातात बेंच प्रेस मध्ये १२० किलो वजन उचलून रौप्य पदक पटकाविले व डेडलिफ्ट मध्ये २०० किलो वजन उचलून सुर्वण पदक पटकाविले.आयुष घाग यांनी ७५ सब-ज्युनिअर वजनी गटात डेडलिफ्ट मध्ये १४५ किलो वजन उचलून सुर्वण पदक पटकाविले. तसेच सातारा, धुळे व पुणे येथील स्पर्धकांनीही पदके पटकाविली. स्पर्धेचे नॅचरल स्ट्रोग पाॅवर लिफ्टिंग फेडरेशनचे पदाधिकारी जुगल धवल व किशोर कुमार आणि भूपेंद्र सचदेव यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.बदलापूर येथील विलास भोईर यांनी ७५ वजनी गटात व मास्टर -३ मध्ये बेंच प्रेस मध्ये १०० किलो वजन उचलून सुर्वण पदक पटकाविले व डेडलिफ्ट मध्ये १९० किलो वजन सुवर्ण पदक व स्टाॅगमॅन पटकाविले. याचा शहरातील संजय दाभोळकर यांनी ८२ वजनी मास्तर-४ मध्ये १०० किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले. व डेडलिफ्ट मध्ये १५० किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले.

या शहरातील डॉ. राजेश यादव यांनी ८२ वजनी गटात मास्टर-२ मध्ये बेंच प्रेस मध्ये ६२.५ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकाविले व डेडलिफ्ट मध्ये १३० किलो वजन उचलून रौप्य पदक पटकाविले. स्पर्धेत मुंबईचे संभाजी आंकलेकर यांनी मास्टर-६ मध्ये बेंच प्रेस मध्ये ६५ किलो वजन उचलून सुर्वण पदक पटकाविले व डेडलिफ्ट मध्ये ७० किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले.



Post a Comment

Previous Post Next Post