डोंबिवली / शंकर जाधव : पायी चालत पूल ओलांडताना एका वृद्ध इसमास बसने धडक दिल्याने जखमी झाले. हि घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलावर घडली.जखमी वृद्धास जवळील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शिवशंकर जोशी (५४) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.कोपर रोड मधील हे रहिवाशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पायी चालत कोपर पुलावरून जात होते.त्यावेळी शास्त्रीनगर रुग्णलयालगत असलेल्या बस थांबा येथून नवी मुंबईला जाणारी बस या पुलावरून डोंबिवली पूर्वेकडील दिशेने जात असताना जोशी यांना धडक दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या घटनेने वृद्धाला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.
Tags
महाराष्ट्र