कायापालटात पालिका आयुक्त निवासस्थान आकर्षक ठरले
डोंबिवली / शंकर जाधव : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे नाव व कार्य पूर्वेकडील ९० फिट रोडवरील भिंतींवर वर्षभरापूर्वी चित्ररूपाने रंगविली होती.आता पालिकेच्या कायापालट अभियानांतर्गत कल्याण मधील पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाची भिंती आकर्षक ठरली आहे.या भिंतीवर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा इतिहास चित्राच्या माध्यमातून रंगविला आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक किल्लेप्रेमी प्रयत्न करत असताना दिसतात.या किल्ल्याची माहिती शालेय जीवनात पुस्तकातून शिकविला जात असून या किल्ल्याची माहिती आता भिंती चित्रातून दाखविण्यात आहे.कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या कायापालट अभियानांतर्गत भिंती चित्र उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कल्याणमधील पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निवासस्थानाच्या भिंतींवर गडकिल्ल्यांची नावे चित्रारूपाने दाखविण्यात आली आहे.या भिंतींना रंगरंगोटी व रोषणाई केल्याने या भिंतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.जे जे स्कुल ऑफ आर्टची विद्यार्थिनी कृती पटेल हिने भिंती रंगविली आहे.या अभियानात कल्याण- डोंबिवलीतील भिंती रंगविल्या जाणार असून या अभियानात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.