भाजपचे रोहिदास मुंडेंची आयुक्तांकडे मागणी
दिवा / शंकर जाधव : दिवा विभागातील टाटा रोड बी आर नगर येथील रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून तेथील लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे अशी प्रमुख भूमिका दिवा भाजपने दिवा प्रभाग समिती मध्ये मांडली होती. त्यानुसार तेथील लोकांचं बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेही झाला होता त्यानंतर त्यांचे पुनर्वसन होईल व त्यांना रूमच्या चाव्या देण्यात येतील असे दिवा प्रभाग समितीतून सांगण्यात आले होते. परंतु काल अचानक येथील रूमवर तोडक कारवाई करून तेथील रहिवाशांना बेघर करण्यात आलं आहे.
या संदर्भात तातडीने रोहिदास मुंडे यांनी जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे साहेब यांची भेट घेऊन ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची काल संध्याकाळी मुख्यालय भेट घेऊन या संदर्भात आयुक्तांना याची माहिती दिली व त्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी आयुक्तांना सांगितले की पहिले लोकांचे पुनर्वसन करा त्यानंतरच कारवाई करा पावसाळा जवळ आहे लोक बेघर होतील तर त्यांचं प्रथम पुनर्वसन करा आणि मगच कारवाई करा असे आमदार निरंजन डावखरे यांनी आयुक्तांशी चर्चेत म्हटले आहे.