रिक्षाचालकांना लुटणारे अटकेत

डोंबिवली / शंकर जाधव : रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहून निरीक्षण करून जो रिक्षाचालक सोन्याचे चेन घालतो त्याची रेकी करायची.त्या रिक्षाचालकाचा पाठलाग करून त्याला टार्गेट करायचे. लांबच भाडे सांगायचे जेणेकरुन रिक्षाचालक भाडे नाकारणार नाही.मंदिरात जाऊन त्या प्रसादात गुंगीचे औषध देऊन लुटायचे ट्रिक ठरलेली.मात्र पोलिसांच्या नजरेतून हे लुटरे सुटले नाहीत.या दोघा लुटारूंना मिरा-भाईदर पोलिसांनी अटक केली.दोघांनी डोंबिवली शहरातही लूट केल्याचे पोलीस चौकशीत सांगितल्यावर तेथील पोलिसांनी विष्णुनगर पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक राकेश म्हामुणकर यांच्या फिर्यादीवरून सागर महेंद्रभाई पारेख (३१ ) आणि संपतराज गेवेचंद जैन ( ४८) असे अटक केलेल्या लुटांरूचे नाव आहे.८ फेब्रेवारी रोजी रिक्षाचालक राकेश यांच्या रिक्षात हे दोघे डोंबिवली पश्चिमेकडील मच्छीमार्केटमार्केट परिसरातून बसले.शहाड येथील बिर्ला  मंदिरात हे भाडे लांबचे असल्याने राकेश जाण्यास तयार झाला.मंदिरात पोहोचल्यावर दर्शन घेऊन सागर आणि संपतराव हे दोघे मंदिराचा प्रसाद म्हणून पेढे असल्याचे राकेशला सांगितले.मात्र पेढे प्रसाद नसून हा त्या दोघांच्या ट्रिकमधील एक भाग होता.या पेढ्यात दोघांनी गुंगीचे औषध मिसळविले होते.राकेशने पेढे खाल्यावर रिक्षा चालविण्यास सुरुवात केली.पाठीमागे बसलेले दोघे राकेश बेशुद्ध होण्याची वाट पाहत होते.काही अंतरापर्यत पुढे गेल्यावर राकेश बेशद्ध पडला.रिक्षा थांबवुन दोघांनी राकेशचया गळ्यातील सोन्याची चैन, एक मोबाईल व रक्कम असे एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन राकेशला तिकडेच टाकून पसार झाले. राकेश शुद्धीवर आल्यावर गळ्यातील चैन, मोबाईल व रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले.राकेश विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोघा लुटारूंविरोधात गुन्हा दाखल केला.पोलीस या दोघांचा शोध घेत होते.

    एप्रिल महिन्यात मीरा- भाईंदर पोलिसांनी सागर व संपतराव यांना अश्या प्रकारच्या गुन्ह्यात अटक केली होती.या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी फेब्रेवारी महिन्यात  डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाला पेढ्यात गुंगीचे औषध देऊन लूट केल्याचे सांगितले.ही माहिती मिळताच मिराभाईदर पोलिसांनी विष्णुनगर पोलिसांशी संपर्क करून या गुन्ह्यासंदर्भात दोघा लुटारूंना अटक केल्याचे सांगितले.विष्णुनगर पोलिसांनी सागर व संपतराव या दोघांना अटक करून जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल आंधळे यांनी दिली.

सोन्याची चेन घालणाऱ्यांना लुटत

 सगर महेंद्रभाई पारेख (३१ ) आणि संपतराज गेवेचंद जैन ( ४८)  या दोघांवर मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.हे दोघे सोन्याची चेन घालणाऱ्या रिक्षाचालकांवर नजर ठेवत असे.त्याची रेकी करून त्या रिक्षात बसून लांबचे भाडे सांगायचे.



Post a Comment

Previous Post Next Post