तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढतय

  विशेष दंत मुख आरोग्य तपासणी शिबीर

डोंबिवली / शंकर जाधव :  व्यसनाधीनता हा सर्व प्रकारच्या आजारांचा मुख्य स्त्रोत आहे. सध्या तरुणांमध्ये ई सिगारेट व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. गुटखा, खैनी, जर्दा, पान मसाला ई. धूर विरहित तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण देखील वाढल्याचे इंडीयन डेंटल असोसिएशन डोंबिवली अध्यक्ष डॉ.ललित पाटील यांनी सांगितले. तंबाखू व त्याचे दुष्परिणाम ह्याबद्दल जनजागृती करण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन, डोंबिवली विभाग व कल्याण डोंबिवली महानगरपालिका ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या आवारातविशेष दंत मुख आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते.

    शिबिरात पालिका कर्मचारी व रिक्षाचालक यांची विशेष दंत मुख आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले होते. शिबिरातील उपस्थित कर्मचारी व रिक्षाचालकांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली. शिबिरात डॉक्टर्सने तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल समुपदेशन केले. सदर शिबिरामध्ये ५ रुग्णांमध्ये ओरल सब म्युकस फायब्रोसिस (OSMF) तसेच ११ रुग्णांमध्ये पांढरे चट्टे (white lesion) आढळून आले. 

  यावेळी डॉ.पाटील म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने २०१६-१७ मध्ये घेतलेल्या Global Adult Tobacco Survey (Gats - 2) नुसार भारतात दरवर्षी अनेक व्यक्ती तंबाखू मुळे होणाऱ्या आजाराने दगावतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, नपुंसकत्व ह्यासारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन प्रयत्न करीत आहे. तंबाखू, सिगारेट तसेच ई सिगारेट मुळ्ये तोंडाचा व घशाचा कर्करोग वाढत असल्याकारणाने इंडियन डेंटल असोसिएशन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत स्वच्छ मुख अभियान देखील सुरू केले आहे.सदर तपासणी शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय, ठाणे येथील दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, डॉ. जिनल रोकडे तसेच तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समुपदेशक सुरेखा मनसुख ह्यांची विशेष मदत लाभली.शिबिरात दंत शल्य चिकित्सक डोंबिवली अध्यक्ष डॉ. ललित पाटील, सचिव 

 डॉ. कामेध चौधरी, शिबीर संयोजक , डॉ. अमोल सूर्यवंशी , डॉ. जय कोठारी, दंत शल्य चिकित्सक, (जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे) डॉ.जीनल कोठारी ), डॉ. हर्ष शाह, डॉ. कल्पना यादव, डॉ. कुसुमिता शिराली, डॉ. अंजली मोहन, डॉ. प्रीती चंदनशिवे, डॉ. स्वेता नाईक व डॉ. वनिता क्षिरसागर आदी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post