नाना पटोलेंचा भाजपला टोला
डोंबिवली/ शंकर जाधव : ८ ऑक्टोबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली.आता पुन्हा दोन हजाराची नोटबंदी करून या सरकारला जनतेच्या रागाला सामोरे जावे लागणार आहे. ५०० आणि १००० च्या नोटा आतंकवाद , नक्षलवाद आणि काळ्या पैशाचा व्यवहार करण्यासाठी फायद्याचे आहे असे सांगत नोटाबंदी केली होती.त्यावेळी अनेकांचा मृत्यु झाला होता. ६ ते ७ वर्षांनंतर ही चूक आल्यावर मोदींनी पुन्हा नोटबंदी लादली.आता लोकांना पुन्हा एकदा रांगेत उभे केले.त्यामुळे आता संतापलेली जनता नोटा बदलतील तसे पंतप्रधान बदलतील असा टोला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला.
डोंबिवलीत ज्येष्ठ पदाधिकारी संतोष केणे यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोल आले होते. यावेळी , रत्नप्रभा म्हात्रे,सदाशिव शेलार, राहुल केणे, प्रणव केणे, नवीन सिंग, श्रीकृष्ण सांगळे,रत्नप्रभा म्हात्रे, वर्षा जगताप,पमेश म्हात्रे ,दीप्ती दोषी, शरद भोईर,शीला भोसले,अभय तावरे,नवेन्दु पाठारे, किशोर, गजानन पाटील, मधुकर माळी, रोहिदास पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे- फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर पटोले म्हणाले,मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यादिवशी शिंदे- फडणवीस सरकार पडेल, या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही.एका मंत्र्याला चार पाच जिल्हे आहेत.पालकमंत्री म्हणून काम पाहावे लागत आहे.मोदींची तानाशाही आहे.प्रशासन नेमले आहे, त्यामुळे हे जनतेची लूट करणारी व्यवस्था आहे.नवीन संसदीय इमारत उदघाटन पंतप्रधान करत आहे.
संसदीय मूल्य जोपासले पाहिजे हेही राज्यकर्त्याना समजत नाही.राष्ट्रपती हे लोकसभेचे आणि राज्यसभेचे प्रमुख असतात.राष्ट्रपती पद हे संविधनिक पद मोठे आहे.केबिनेट निर्णयाची मान्यता राष्ट्रपतीकडून घेतली जाते.सर्व पक्ष एकत्र यावे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. देशात लोकशाही मजबूत करण्याचे काम संविधानने केली आहे.मात्र संविधानच संपविण्याचे काम होत असतील त्यावेळी त्यानंही काळजी आहे त्यांनी विरोध केला आहे
पटोले यांचा खासदार शिंदे यांना प्रश्न
डोंबिवलीत रस्त्यावर कचरा, दुरावस्था आहे, ठाणे जिल्हात आदिवासी लोकांना रस्ता नाही,पिण्याचे पाणी नाही.आरोग्य व्यवस्था नाही. मुंबईजवळील हे ठाणे जिल्ह्याची ही अवस्था आहे.मोठी पद मिळाल्यावर व्यवस्थेला चांगले काम करू शकले नाही असा माझा येथील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना उपस्थित केला आहे.