दिवा / शंकर जाधव : नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नववर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे शिबिर दिवा शहरात आयोजित करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 79 येथे 24 मे ते 28 मे या पाच दिवसात हा लोकहिताचा कार्यक्रम दिवा भाजपने आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला दिव्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून या योजनांचा नागरिक लाभ घेत आहेत. यात प्रामुख्याने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी,पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना,दिन दयाल अंत्योदय योजना, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना, प्रधानमंत्री ई-श्रम योजना, बचत गट नोंदणी व सवलतीत कर्ज पुरवठा अशा योजनांचा यात समावेश आहे. या योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा म्हणून ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात दिवा मंडळात या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाची प्रमुख जबाबदारी विनोद भगत, ज्योती पाटील,समीर चव्हाण, सतीश केळशीकर यांच्यावर देण्यात आली असल्याची माहिती दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिली. या योजनेचा दिव्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे दिवा भाजप कडून जनतेला आव्हान करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाला आज निरंजन डावखरे यांनी कार्यक्रम स्थली भेट दिली व मार्गदर्शन केले यावेळी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार अशोक पाटील विजय भोईर ठाणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत, दिवा शहर मंडलाध्यक्ष रोहिदास मुंडे, संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, रोशन भगत, नागेश पवार, रेश्मा पवार ,विद्यासागर दुबे, अवधराज राजभर, राहुल साहू प्रफुल साळवी राम पलट प्रजापती नितीन कोरगावकर निकिता सावंत रिता सिंग व ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.