बंद घराला चोरट्याने केले टार्गेट
डोंबिवली / शंकर जाधव : कामानिमित्त बाहेर गेलेल्या एका कुटुंबीयांचे घर टार्गेट करून घरातील सुमारे ४० लाखाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना २५ ते २८ एप्रिल दरम्यान डोंबिवली पश्चिमेकडे घडली.या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांंकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीनिवास कुरुपोली हे आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिमेकडील साऊथ इंडियन शाळेजवळील भाविक अपार्टमेंट येथे राहतात.२५ ते २८ दरम्यान कुरुपोली हे कुटुंबियांसह उत्तरप्रदेश येथील वाराणसी येथे कामानिमित्त गेले होते.कुरुपोली यांचे घर बंद असल्याने चोरट्यांची नजर गेली.चोरट्यांनी संधी पाहत घराच्या दरवाज्याचे सेफ्टी कोयंडा तोडून दरवाज्याचे कडी कोयंदा तोडून घरात प्रबेश केला.
घरातील कपाटाला ३९,२६,९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झाले. घर परतल्यावर कुरुपोली यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी पोलीस निरीक्षक ( गुन्हे) आर.एस.खिलारे हे पुढील तपास करत आहेत.