हिंदू जिमखान्याच्या विजयात सिद्धार्थ पारीख चमकला

बीएसएएम मुंबई बिलियर्ड्स लीग 2023
मुंबई, : पी.जेहिंदू जिमखाना ’’ संघाने जुहू विलेपार्ले जिमखाना संघाचा (जेव्हीपीजी) 441-259 अशा मोठ्या फरकाने पराभव करताना बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (बीएसएएमआयोजित ग्रेटव्हाइट-सीसीआय केकू निकोल्सन मुंबई बिलियर्ड्स लीगच्या (2023) उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलीअनुभवी बिलियर्ड्सपटू सिद्धार्थ पारीखने 112 आणि 79 गुणांचा ब्रेक त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सर विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये गेलेल्या सामन्यात राउंड ऑफ सिक्स्टिन फेरीत पारीखने छाप पाडलीस्पर्धेतील त्याचा हा दुसरा शतकी ब्रेक आहेयापूवीसाखळी फेरीत त्याने 204 गुणांचा ब्रेक केला होता.
दरम्यानगतविजेते मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनने (एमसीएफमाटुंगा जिमखाना ‘’ संघाची घोडदौड 426-328 अशी रोखताना जेतेपद राखण्यादृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकलेयजमान क्रिकेट क्लबला बॉम्बे जिमखान्याकडून 465-522 असा पराभव पत्करावा लागला.
एनएससीआयने देखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना शिवाजी पार्क जिमखान्याला 656-523 असे पराभूत केले.

Post a Comment

Previous Post Next Post