भिवंडी, दि. २३ : भिवंडी शहरात वीज वितरण व विज बिल वसुली करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीकडून वीज चोरी करणाऱ्यां विरोधात नियमित कारवाई करून वीज चोरीला अटकाव केला जात आहे. नुकताच तालुक्याच्या ग्रामीण भागात अशाच वीज चोरी प्रकरणी दोन ग्राहकांवर कारवाई करत सुमारे साडेचार लाखांच्या वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार गुंदवली गावातील रामदास म्हात्रे यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी विजमिटर बॉक्स मध्ये टोरंट पॉवर कंपनीच्या केबलला अनधिकृत केबल जोडून विजमिटर बायपास करून अनधिकृतरित्या विजपुरवठा घेवून 9646 युनिट विद्युत भार वीज वापर करून २ लाख 1 हजार 881 रुपयांची वीज चोरी केली.
तर दुसऱ्या घटनेत काटई, कांबा रोड येथील वीज वापरणारे भरत भोईर यांनी वर्षभर आपल्या आर्थिक फायद्यासाठी तेथून जवळ असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या फ्युझ सेक्शन पिलर मध्ये केबल जोडून विज मिटर शिवाय विजपुरवठा घेवून 11121 युनिट विद्युत भार वापरून 2 लाख 62 हजार 915 रुपयांची वीज चोरी केल्याचे तपासणीत उघड झाली आहे. या दोन्ही प्रकरणांत शांतीनगर पोलिस ठाण्यात एकूण ४ लाख 64 हजार 796 रुपयांच्या वीज चोरी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Tags
महाराष्ट्र