ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा राजकीय झटका बसला आहे. ठाणे आणि कल्याण परिसरातील त्यांच्या काही विश्वासू समर्थकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या प्रवेशामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मिलिंद पाटील, मनाली पाटील, महेश साळवी, मनीषा साळवी, सचिन म्हात्रे आणि सुरेखा पाटील यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते मंदार मुकुंद केणी आणि माजी नगरसेविका प्रमिला मुकुंद केणी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
या नेत्यांनी शिंदे स्थानिक प्रश्नांची दखल घेतली जात नाही आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही. त्यामुळे विकासाच्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज जाणवत होती, हे कारण देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व नेत्यांचे स्वागत करत सांगितले की, "आम्ही सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहोत. शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान आणि संधी मिळेल."
आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख कामावर विश्वास ठेवून या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्वांनी एकत्र येऊन कळवा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा निर्धार व्यक्त केल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे ,उमेश पाटील ,योगेश जानकर,मनोज लासे तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
या घडामोडीमुळे जितेंद्र आव्हाड यांच्या स्थानिक संघटनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जितेंद्र आव्हाडांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच त्यांनी जी काही कारणे सांगितली आहेत त्याचा फटका देखील बसू शकतो.