अंबरनाथ/ अशोक नाईक : मुक्या प्राण्यांसाठी अतिशय तळमळीने काम करत, मुक्या प्राण्यांसाठी त्यांच्या हितासाठी कार्य करत असताना स्वतःच्या जीवाकडे लक्ष न देता सतत कार्यमग्न असणाऱ्या शामला राव यांचे शुक्रवारी पहाटे दुःखद निधन झाले.
४०० मुलांची आई...मुक्या प्राण्यांसाठी एक आधार असणारी आई श्यामला राव यांनी साडेचार वाजता मीरा हॉस्पिटल येथे शेवटचा श्वास घेतला, त्यांच्या सारख्या प्राणी मित्र आणि प्राण्यांची सेवा करणारे व्यक्तिमत्व कधीही होऊ शकणार नाही. मुक्या प्राण्यांची एक आई त्यांना सोडून गेल्याची हळहळ भावना अनेकांनी व्यक्त केले.
प्राणी मित्र शामला राव यांनी आपले जीवन प्राणी सेवेला समर्पित केले. त्यांनी विशेषतः जखमी आणि निराधार प्राण्यांची सेवा केली. कुत्र्यांसह इतर प्राण्यांचा ह त्यात समावेश होता . शामराव या आपल्या आयटी इंजिनिअर पती आणि मुली सोबत बदलापूर परिसर आणि ग्रामीण भागातील जखमी आणि बेवारस कुत्र्यांची देखभाल करत होती. रोज आपल्या गाडीतून दुकानांमध्ये जाऊन मांस गोळा करून श्वानांना खाऊ घालत असे. बारवी धरण क्षेत्रातील मोठ्या जंगल परिसरात सुमारे ४०० श्वानांना अन्न आणि उपचार करत होत्या. काही वर्षांपासून त्यांनी रायता क्षेत्रात श्वानांसाठी आश्रयस्थान बनवले. अखेर त्यांच्यावर अंत्यविधी संस्कार शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता बैल बाजार स्मशानभूमीमध्ये करण्यात आले.