वऱ्हाडी मंडळींची एकच पळापळ
अंबरनाथ \ अशोक नाईक : सोळा संस्कारांमध्ये लग्न सोहळ्याचा थाटमाट काही औरच असतो. हल्ली लग्न समारंभ आगळावेगळा पद्धतीने आकर्षक करण्यासाठी यजमान काय करतील याचा नेम नाही. कोकणपट्टीत हळदी समारंभ दणक्यात साजरा केला जातो. सोशल माध्यमावर झळकावू अशा काही सेलिब्रिटीसह इतर सामाजिक उपक्रम केले जातात. मात्र थेट हळदीच्या सोहळ्यात खिल्लार बैल नाचून त्यावर पैशाची लयलूट केली जात असल्याचा सोशल माध्यमांवर धमाकेदार व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या हळदी कार्यक्रमात आणलेला बैल उधळला आणि वऱ्हाडींची एकच तारांबळ उडाल्याचा व्हिडिओ पाहून ठाणे,रायगड जिल्ह्यात रंगतदार चर्चेचा विषय ठरला आहे.
ठाणे, रायगड जिल्ह्यात हळदीच्या कार्यक्रमात खिल्लार बैल नाचविण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. याप्रथेमुळे अपघात अपघातांच्या घटना घडू लागले आहेत. रविवारी कल्याण शीळ रस्त्यावर पडले गावात एका कुटुंबीयांच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. पाहुणेमंडळी आणि कुटुंबीय नाचण्यात दंग होते. इतक्यात अचानक काही उत्साही तरुणांनी बैल नाचवण्यासाठी आणला. वाजंत्री आणि रंगमंचाच्या अगदी समोर हा बैल आणून उभा करण्यात आला. काही लोकांनी त्याच्यावर पैशाची उधळण देखील सुरू केली. काहीजण बैला सोबत सेल्फी घेत होते.
'तेरे अंगने में मेरा क्या काम है'राग आलेल्या बैलाने जोरदार मुसंडी उडी मारली आणि तिथून पाण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाचणाऱ्यांना तुडवत बैलाने पळ काढला. या भन्नाट प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या आनंदी हळदीच्या उत्साहावर पाणी फिरण्याचे दिसून येत आहे. सर्व भराडी मंडळी यांची पळापळ झाल्याचे दिसते आहे. अनेक महिला वऱ्हाडी जीव वाचून पळताना दिसत आहेत...अखेर काही वेळात या तरुणांनी त्या बैलाला आटोक्यात आणल्याचेही दिसत आहे. त्यानंतर वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडल्याचे दिसत आहे.