कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजप वाद लवकरच मिटेल

 


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन 

डोंबिवली / शंकर जाधव : भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढतच असताना त्यात रामदास आठवले यांनी दोन्ही पक्षाचा वाद लवकरच संपुष्टात येईल असे म्हटले आहे. तसेच श्रीकांत शिंदे भाजपला दुखावण्याचा प्रयत्न करणार नाही अशी कुठेतरी चर्चा आहे.

 भाजपसोबत गेल्यानंतर तसेच भाजप कल्याण डोंबिवलीत आपले पाय मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा फटका कुठेतरी शिवसेना कार्यकर्त्यांला बसत असल्याचे पहावयास मिळत आहे.  कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेना - भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली, याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संगीतले की हा वाद मिटेल, हा वाद मिटवण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा आहे हा वाद मिटेल. या ठिकाणी भाजप शिवसेना आणि आम्ही एकत्र आहोत, असा वाद करणे योग्य नाही. त्यामुळे लवकरच हा वाद मिटेल. श्रीकांत शिंदे इकडचे सीटिंग उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे. आम्ही सगळे एकत्र बसून या संदर्भातील निर्णय घेऊ असेही आठवले यांनी सांगितले. 


#भाजप-शिवसेना वाद #रामदास आठवले #श्रीकांत शिंदे #कल्याण-डोंबिवली लोकसभा वाद

Post a Comment

Previous Post Next Post