शिंदे –फडणवीस सरकारने जनतेला गरीब करण्याचे पाप केले

 


         नाना पटोले यांचा टीका

डोंबिवली ( शंकर जाधव ) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुठभर लोक श्रीमंत झाले आणि जनतेला गरीब करण्याचे पाप केले. केंद्रातील भाजप सरकारला महागाई कमी करण्यास अपयश आले आहे. या सरकारमध्ये गरीब जनतेला पोटभर जेवणही मिळत नाही अशी टीका कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी डोंबिवलीतील केली. मी आज डोंबिवलीतील जनतेला हात जोडून विनंती करतो की, कॉंग्रेस पक्ष हा गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी बनला आहे. देशात महागाई कमी करण्याचे काम कॉंग्रेस पक्षच करू शकतो. म्हणून आगामी निवडणुकीत डोंबिवलीकरांनी कॉंग्रेसला भरभरून मते देऊन निवडणूक आणावे. दरम्यान इंदिरा नगर येथील गरीब जनतेने पटोलेंबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

आता कॉंग्रेस पक्षावर जनतेची अपेक्षा वाढली आहे. गरीब जनतेसाठी स्थापन झालेल्या कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकदा निवडणू द्या असे आवाहनही पटोले यांनी डोंबिवलीकरांना केले.

 प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे कै. कामगार नेते सीताराम शेलार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. त्यांनतर इंदिरानगर येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, संतोष केणे, नवीन सिंग, माजी नगरसेवक सदाशिव शेलार, अजय शेलार, अशोक कापडणे, अजय पौळकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    नाना पाटोले म्हणाले, कै.सीताराम शेलार हे कामगार नेते होते. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली होती. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी झोपडपट्टीतील नागरिकांच्या विकासाच्या द्दृष्टीकोनातून कामे केली. कल्याण –डोंबिवलीत कॉंग्रेसची सत्ता गेल्यावर विकासची कामे झाली नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुठभर लोक श्रीमंत झाली तर जनता मात्र गरीबच राहिली. आज भाजप सरकारमध्ये महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणे अवघड झाले आहे.

 निवडणूकीत मते विकत घेऊ अशी भाषा करणारे या लोकाना आता सत्तेतून खाली पडण्याची वेळ आली आहे. निवडणुका आल्या कि विकत घ्यायचे, मग पुन्हा महागाई वाढवायची, सत्तेवर आल्यावर जनतेला लुटायचे हे जनतेला कळले आहे. तुमच्या मतावर, भरोश्यावर ते सत्तेवर आले आणि मुठभर लोकांना श्रीमंत केले. सर्वसामान्य जनता जीएसटी भरते आणि त्या पैशावर हे लोकांना विकत घेण्याची भाषा करतात. 



Post a Comment

Previous Post Next Post