कल्याण लोकसभा प्रमुखपदी जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे
डोंबिवली : भाजप पक्ष वाढीकडे तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त होण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४८ लोकसभा व २८८ विधानसभेच्या निवडणूक प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा प्रमुखपदी जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांची तर कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुखपदी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याण लोकसभा प्रमुखपदी जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांची निवड केली आहे, तर कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुखपदी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पूर्व विधानसभा संजय मोरे, कल्याण ग्रामीण विधानसभा नंदू परब, डोंबिवली विधानसभा प्रज्ञेश प्रभुघाटे, अंबरनाथ विधानसभा गुलाबराव करणजुळे पाटील, यांची लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक प्रमुखपदी भाजप कल्याण जिल्ह्यामधील प्रमुख पदाधिकारी यांची निवड केली आहे. कल्याण जिल्ह्यातील नेत्यांकडे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारला निवडून आणण्यासाठी पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.
भाजपने आगामी काळात कल्याण-डोंबिवलीत आपले वर्चस्व मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

