वयाच्या पाचव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचण्याचा विक्रम

केवळ नऊ दिवसात 5364 मीटर सर केले.

डोंबिवली / शंकर जाधव : वयाच्या पाचव्या वर्षी प्रिशा निकाजूने केवळ नऊ दिवसात जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर आपला ठसा उमटविला आहे. 5364 मीटर 17598 फूट उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅंम्पवर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय मुलगी असल्याचा तिच्या वडिलांनी दावा केला आहे.  

 ठाणे येथील पलावा सिटी फेज २ लेक शोर ग्रीन्स, एलिट एफ येथे राहणारे गिर्यारोहक लोकेश निकाजू यांच्या प्रिशाने वयाच्या ५ व्या वर्षी २४ मे २०१३ रोजी नेपाळमधील लुकला येथून एव्हरेस्ट बेस कॅंम्पवर पोहोचण्यास सुरुवात केली. तिच्याबरोबर तिचे वडील लोकेश गेले होते. १ जून रोजी प्रिशाने भारतीय ध्वज धरून एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकविला. ४ जून रोजी लुक्ला ( नेपाळ ) येथे परतली. 

       तिच्या वयोगटातील कोणत्याही मुलीने आजपर्यत ९ दिवसात  एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत मजल मारली नाही. वडील लोकेश निकाजू आणि सीमा यांच्याकडून तीने कठीण उंचीच्या ट्रेकसाठी प्रशिक्षण घेतले. या ट्रेकला जाण्यासाठी ती दररोज ५ ते ६ मैल चालण्याचा सराव करत होती. प्रिशाला पोहणे, कराटे,सटेबल टेनिस या खेळांची आवड आहे. प्रिशाचे वडील लोकेश नोकाजू हे गिर्यारोहक आणि अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिरिंग ॲड अलाईड स्पोर्टस, मनालीचे माजी प्रशिक्षणार्थ आहेत.

हिमालय, धौलागिरी,अन्नपूर्णा आणि देश, वेदेशचे आणखी शिखरे सर करण्याचे प्रिशाचे स्वप्न आहे. तिच्या इच्छा यादीत माउंट एव्हरेस्ट देखील आहे.भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने तिच्या प्रतिभेला पाठिंबा आणि मान्यता द्यावी अशी अपेक्षा तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

 ही गिर्यारोहक असून तिने कमी वयात ट्रेकिंगला सुरुवात केली. सिंहगड, लोहगड, विसापूर, कळसुबाई, कर्नाळा, सोंडाई, कोथळीबाई, ईशाळगड, प्रबळमाची, कलावंतीण, शिवनेरी, रायगड किल्ले म्हणून महाराष्ट्रातील अनेक किल्ले सर केले आहेत.तिला ट्रेकिंगची आवड असून यापूर्वी तिने वयाच्या ३ वर्षी महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर सर केल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post