त्या पीडित महिलेला कॉंग्रेसचा मदतीचा हात

   न्यायालयीन लढाईत काँग्रेस साथ 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) न्याय मिळावा याकरता गेली २८ दिवस पिढीत महिला डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात उपोषणास बसली आहे. भाजपच्या डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांना अटक करा अशी मागणी पिढीत महिला करत असून अद्याप याप्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पिढीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस मदत करील असे आश्वासन पटोले यांनी पत्रकारासमोर दिले होते.शुक्रवारी काँग्रेस न्याय व विधी सेलने पिढीत महिलेची भेट घेतली.

 पिढीत महिलेला सर्व मदत केली जाणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे विधि विभागाचे प्रदेश अध्यक्ष एडवोकेट रवि राव, कल्याण बार एशोसिएशन एडवोकेट प्रकाश जगताप , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,नागरी विकास सेल चे अध्यक्ष एडवोकेट नविन सिंग , प्रदेश काँग्रेस कमीटीचे सचिव संतोष केणे , शिबू शेख , एकनाथ म्हात्रे , संकेत लोके ,राहुल केणे यांसह पदाधिकारी यांनी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post