डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली युवा शहर अधिकारी राहुल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही शैक्षणिक उपक्रम म्हणुन कसारा येथिल लतिफवाडी जिल्हा परिषद शाळेत आंगणवाडी आणि प्राथमिकच्या शेकडो विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
शाळेतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू म्हणजेच वह्या, पेन, पट्टी, पेन्सिल, भौमितिक कंपास पेटी, चित्रकला वही, रंगपेटी इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले .फक्त पार्टी आणि गिफ्ट घेऊन वाढदिवस साजरा करणं मला कधीचं पटलं नाही. माझ्या या खास दिवशी कोणातरी गरजु व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू यावं, असं मला वाटतं.' असे राहुल चौधरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कल्याण लोकसभा सह संपर्कप्रमुख अरविंद बिरमोळे,डोंबिवली उपशहर प्रमुख अभिजीत सावंत, विभाग प्रमुख प्रमोद कांबळे, माजी सरपंच अशोक झोपे आणि अरुण कांबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.