डोंबिवलीत फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई १८२ वाहनांवर कारवाई

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार डोंबिवली पूर्वेकडील म्हसोबा चौक,९० फिट रोड येथे फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये विदाऊट हेल्मेट - ४९ , विदाऊट सीट बेल्ट २२, जम्पिंग सिग्नल ०६ ,ब्लॅक फिल्म ०१, ट्रिपल सीट ०४, फ्रंट सीट ०३ , गणवेश न घालने ०३ व इतर ९४ अशा एकूण १८२ वाहनचालकावर कारवाई करत १,०३१,१५० इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी ७२९०० दंड वसूल करण्यात आला आहे.        

कारवाईमध्ये डोंबिवली वाहतूक विभागाचे १ अधिकारी, ९ पोलीस अंमलदार व ८ वॉर्डन तसेच कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे २ अंमलदार,१ वॉर्डन व कल्याण वाहतूक उप विभागाचे २ पोलीस अंमलदार असे एकूण १ अधिकारी, १३ अमलदार, ०९ वॉर्डन हजर होते.यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सीसीटिव्ही कॅमेरा द्वारे वाहतूक विभागाकडून ई चलन कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आल्याची माहिती डोंबिवली वाहतूक उपविभाग पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post