एकाला अटक, दोघांचा शोध
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली सारख्या सुसंस्कुत शहरात स्टेशन समोरील पाटकर रोडवर व्हीईन शॉप समोरील कट्ट्यावर दररोज रात्री आठ नंतर दारूची पार्टी होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहे. हे तिघेही रिक्षाचालक असून हा प्रकार २८ तारखेला रात्री घडला. यातील दोघे नातेवाईक असून तिसरा साथीदार हा त्यांचा मित्र आहे.
डोंबिवली पूर्वेकडील आता मध्यरात्री याच रस्त्यावर तरुण मुले हुक्का पार्टी करत असल्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमात व्हायरल होत आहे. असे प्रकार सुरु असून पोलीस मात्र शांत का असा प्रश्न डोंबिवलीकरांकडून विचारला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय विलास पवार ( २१,रा.सोनारपाडा, डोंबिवली) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन समोरील पाटकर रोडवर मध्यरात्री रस्त्याच्या कडेला बाकडा टाकून काही तरुण हुक्का पार्टी करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे.पाटकर रोडवर रोड व्हाईन शॉप असून या तळीराम या व्हाईन शॉपमधून दारू घेऊन समोरील कट्टावर बसून ओल्मेट पाव खात दारू डोसत बसलेले असतात.हा प्रकार अनेक वर्षापासून सुरु असून वृत्तपत्रात बातमी आल्यावर काही दिवस कारवाई होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा कट्टावर दारूची पार्टी सुरु होते. दोन –तीन वर्षापूर्वी समाजसेवक जगदीश ठाकूर यांनी कट्टावरील दारूड्यांना दारू पीत असताना चोप दिला होता.पोलिसांनी यावर कडक करवाई करण्याची मागणी असूनही अद्याप यावर कारवाई झाली नाही.
९० फिट रोडवर दारूची पार्टी
मोडेल रस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या ९० फिट रस्त्यावरहि रात्रीच्या वेळी दारूची पार्टी होत असते. मात्र आजवर या तरुणांवर कारवाई झाली नाही. ९० फिट रस्त्यावर दिवसरात्र वाहनाची वर्दळ असल्याने दारूड्यांच्या पार्टीमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.