माजी नगरसेवक धात्रक दाम्पत्याचे आयुक्तांना घातले साकडे....
डोंबिवली / शंकर जाधव : गेल्या आठ वर्षापासून धोकादायक स्थितीत असलेल्या डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोड येथील विष्णू नगर पोस्ट ऑफिस कार्यालयाची इमारत कोसळण्याची शक्यता आहे. या धोकादायक इमारतींच्या आवारात रस्त्यावर फेरीवाले ,भाजीवाले आपले व्यवसाय करीत असून रहदारीचा रस्ता आहे. येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असल्याने अतिवृष्टी मुळे या इमारतीची पडझड होण्याची शक्यता असल्याने जीवित हानी टाळण्यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका व नगरसेवक मनीषा धात्रक व शैलेश धात्रक या धात्रक दाम्पत्यांनी पालिका आयुक्ताची भेट घेतली व या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले व सदरची धोकादायक इमारत त्वरित निष्कासित करण्याच्या मागणी साठी आयुक्तांना साकडे घातले आहे.
डोंबिवली पश्चिम विभागातील भाजपाच्या माजी नगर सेविका मनीषा धात्रक यांनी प्रभाग क्र.६० गणेश मंदिर ,एलोरा सोसायटी भागात नागरिकांना रस्त्यावर चालण्यासाठी मोकळे रस्ते असावे या करिता रस्त्यावर फेरीवाला बसू नये या साठी दक्षता घेत परिसर फेरीवाला मुक्त केला आहे गेल्या आठ दहा वर्षा पासून या प्रभागातील रस्त्यावर फेरीवाले बसू नये या साठी पालिका प्रशासनाच्या पाठी लागून परिसर मोकळा केला आहे .डोंबिवली स्टेशन परिसराला जोडणारे रस्ते आल्याने या रस्त्यावर प्रवाशी वर्ग तसेच नागरिकांची नेहमीच वर्दळ असते फेरीवाला मुक्त परिसर केल्याने स्टेशनला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्ते मोकळे व सुटसुटीत मिळत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत असताना गेल्या काही दिवसां पासून स्टेशन परिसराला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे व फेरीवाले बिनदिक्कत बसू लागले आहेत पालिकेच्या फेरीवाला हटाव नियंत्रण विभागाकडे कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने फेरीवाल्यांवर कारवाई करता येत नसल्याचे विभागाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे असल्याने अधिकाऱ्याचाच फेरीवाल्यांना छुपा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.स्टेशन परिसरात बेकायदेशीर पने बस्तान मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई साठी मनीषा धात्रक यांनी गेल्याच आठवड्यात पालिका प्रशासनाला निवेदनाचे पत्र दिले होते तसेच कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देऊनही पालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेरीस कारवाई साठी माजी नगरसेविका मनीषा धात्रक व नगरसेवक शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्ताची भेट घेत बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई च्या मागणी साठी स्मरण पत्र दिले तसेच डोंबिवली पश्चिमे कडील दीन दयाळ रोड वरील विष्णू नगर पोस्ट ऑफिसची इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीतील पोस्ट ऑफिसचे कार्यालया मध्ये येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून आठ वर्षा पूर्वी या इमारतीतील पोस्टाचे कार्यालय खाली करून अन्य ठिकाणी पोस्टाचे कार्यालय हलवण्यात आले होते.
धोकादायक इमारतीच्या समोर रस्त्यावर फेरीवाले
गेली आठ वर्ष ही इमारत धोकादायक अवस्थेत मरणयातना अवस्थेत उभी असून कधीही कोसळू शकते अशी चिन्हे दिसून येत आहेत या धोकादायक इमारतीच्या समोर रहदारीचा रस्ता असून शेकडो नागरिक दररोज येजा करतात तसेच या रस्त्यावर फेरीवाले भाजीवाले व्यवसाय करण्यासाठी बसत असल्याने ही धोकादाक इमारत अचानकपणे कोसळल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या तसेच रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रित्या व फेरीवाल्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी भीती वाटतं असल्याने सदरची धोकादायक जीर्ण इमारत त्वरित निष्कासित करावी अशी मागणी माजी नगरसेविका मनीषा धात्रक व नगरसेवक शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे याची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

