धोकादायक इमारत पाडण्यास मालक तयार पण हॉटेलमालकाची अडचण

 

मालकाची पोलीस ठाणे व पालिकेकडे धाव 

डोंबिवली /  शंकर जाधव :  धोकादायक इमारतीतील रहिवाशांचा जीव धोक्यात असल्याने ती इमारत स्वतः मालकाने तोडावे अन्यथा पालिका प्रशासनाकडून इमारत जमीनदोस्त केल्यास त्याचा खर्च इमारत मालकाला करावे लागते.अशीच एक इमारती मालक तोडण्यास तयार असून केवळ इमारतीला हॉटेल मालकामुळे हे शक्य होत नाही असा आरोप केला आहे.यासाठी इमारत मालकाने पोलीस ठाणे व पालिका प्रशासनाकडे धाव घेतली आहे.रहिवाशांचा जीव वाचवा याकरता रिपब्लिकन सेना इमारत मालकाला पाठींबा देत आहेत.

   डोंबिवली पूर्वेकडील सांगरली येथील बालाजी मंदिर जवळील बालाजी दर्शनही इमारती विश्वनाथ साळवी यांच्या मालकीची आहे.पालिका प्रशासनाने ही इमारत अतिधोकादायक असल्याचे घोषित केले आहे.पालिका प्रशासनाने ११ मे रोजी इमारत मालकाला नोटीस बजावली होती.इमारत मालक साळवी हे स्वखर्चाने आपली इमारत जमीनदोस्त करण्यास तयार आहेत.पण याच इमारतीतील एका हॉटेल मालकामुळे यात अडचण येत असल्याचे साळवी यांनी पालिका प्रशासन आणि पोलिसांनी धाव घेतली आहे.यासंदर्भात रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे आणि कल्याण डोंबिवली उपजिल्हा अध्यक्ष राजा जोशी यांनी साळवी यांना पाठिंबा दिला आहे.अतिधोकादायक इमारत पाडणे आवश्यक असून तसे झाल्यास रहिवाश्यांच्या जीवाला धोका आहे असे नवसागरे यांनी सांगितले.

दरम्यान, अतिधोकादायक इमारत पडण्यास पालिका प्रशासन नोटीस बजावून १५ दिवसानंतर जमीनदोस्त करते.मात्र या अतिधोकादायक  इमारतीबाबत नोटीस बजावून १५ दिवस उलटले.तरीही पालिका प्रशासना ही इमारत जमिनदोस्त करण्यास काय अडचण आहे यांकडे का लक्ष देत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुर्दैवाने ही इमारत पडल्यास होणाऱ्या हानीबाबत पालिका प्रशासन काय उत्तर देईल असा प्रश्नही उपस्थित होत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post