युवा सेना पदाधिकारी जेधे यांची माहिती
डोंबिवली ( शंकर जाधव ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामाची माहिती जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी युवा सेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे यांनी 'कामावर बोलू काही ' उपक्रम सूरु केला.त्याअंतर्गत या उपक्रमाची श्री गणेशा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राची माहिती सांगितली.
वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, याबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी घडवून, प्रशासकीय सेवेतून समाजाचा, देशाचा विकास घडवणारी पिढी तयार करणे हे सध्या मोठे आव्हानात्मक काम आहे. यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नांनी एक भव्य वास्तू उभी राहिली आहे.स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र ( MPSC / UPSC भवन, अभ्यासिका, ग्रंथालय, डिजिटल प्राथमिक शाळा ) वडवली विभाग, अंबरनाथ (पूर्व ) अशी वास्तू जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण मुंबईत देखील पाहायला मिळणार नाही.या वास्तूमध्ये सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुले येऊन या अभ्यासिकेत येतात. तसेच त्यांची राहण्याची सुद्धा खूप चांगली व्यवस्था केलेली आहे.यात प्रशस्त कॅफेटेरिया , 500 लोकांचा बैठक व्यवस्था असलेला हॉल , 50 मुलांसाठी upsc प्रशिक्षण वर्ग 50 मुलांसाठी mpsc प्रशिक्षण वर्ग आहेत.
सदर वातानुकूलित अभ्यासिकेमध्ये प्रत्येक मुलांची अतिशय सुंदर आसन व्यवस्था केलेली आहे. तसेच प्रशस्थ असा हॉल आणि सोबत अद्यावत शैक्षणिक सोयी सुविधा मिळत असून लाखो विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात सदर अभ्यासिकेचा फायदा होणार आहेत.

