पाणीटंचाई व मनमानी कारभाराच्या निषेधार्थ नागरिकांना रिकाम्या कॅनचे व बादलीचे मोफत वाटप
डोंबिवली ( शंकर जाधव ) दिवा शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आगरी कोळी वारकरी भवनाच्या भूमिपूजन करण्यात आले.या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान भाजपने अनोखे आंदोलन केले.दिवा शहरात पाईपलाईन लोकार्पण सोहळ्याच्या निषेधार्थ दिवा भाजपने रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करत लोकांना पाण्यासाठी रिकामी कॅन व बादलीचे वाटप केले.
मुख्य जलवाहिनीच्या कामांमध्ये व शहरासाठी आलेल्या 800 कोटींच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला असून दिवाशिवसेनेच्या नेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री नव्या पाईपलाईनच्या लोकार्पणासाठी दिव्यात येत असतानाच आदल्या रात्री मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्याने व गेले आठ दिवस दिव्यात तीव्र पाणी टंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर दिवा भाजपने स्थानिक शिवसेना नेत्यांच्या कारभारा विरोधात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिवा स्टेशन येथे निदर्शने केल्याचे मुंडे यांनी सांगितले. यावेळी दिवा मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
