दिव्यात आजही भेडसावते पाणीटंचाई - ज्योती पाटील

 पाण्याच्या नवीन लाईनचा लोकार्पण सोहळा झाला तरीही अडचण

दिवा/ आरती मुळीक परब : दिव्यातील लोकांना पाणी मिळणार सांगून मुख्यमंत्री यांच्या सभेला गर्दी जमवली खरी परंतु नवीन जलवाहिनीचे लोकार्पण झाले तरीही अद्याप दिव्यातील जनतेला पाणी मिळाले नसून अनेक भागात भीषण पाणीटंचाई जैसे थे आहे, अशी प्रतिक्रिया दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी दिली आहे.

दिव्यातील जनतेला गृहीत धरण्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू असून आता दिव्यातील जनतेने स्वतः पुढाकार घ्यायला हवा अशी भावना ज्योती पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाण्याच्या नावाने किती दिवस दिव्यातील जनतेची फसवणूक केली जाणार? आणि दिव्यातील जनता ही पाण्याच्या नावाखाली किती वेळा राजकारण्यांना बळी पडणार? असा सवाल ज्योती पाटील यांनी उपस्थित केला आहे. दिवा शहरात आजही भीषण पाणी टंचाई असून नवीन जलवाहिनीचे लोकार्पण झाले तरी पाणी प्रश्न मात्र अद्यापही सुटलेला नाही. नवीन जलवाहिनीचे लोकार्पण झाले की दिव्यातील प्राणी प्रश्न सुटेल असे अनेकांना सांगून सभेसाठी गर्दी जमवली. आता लोक आम्हाला प्रश्न विचारतात की पाण्यासाठी गेलो मात्र पाणी काही आले नाही. यावर आता पालिका प्रशासन काय उत्तर देणार?असाही सवाल ज्योती पाटील यांनी केला आहे.

 पालिका प्रशासनाने अंतर्गत पाईपलाईन शहरात नियोजनपूर्वक टाकल्याशिवाय पाणी प्रश्न सुटणार नाही हे आम्ही वारंवार सांगत आहोत.शो बाजी करण्यापेक्षा महापालिकेने नागरिकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्यावे असा टोला ज्योती पाटील यांनी लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post