बालाजी गार्डचा रखडलेला रस्ता नागरिकांच्या सेवेत

 

  मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याने रस्ता खुला

डोंबिवली / शंकर जाधव :  केडीएमसीच्या विकास आराखड्यात असलेला आयरे येथील बालाजी गार्डन संकुलात जाणारा रस्ता अनधिकृत बांधकामामुळे रखडला होता. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी या संदर्भात पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण केले. मनसे आमदार पाटील यांनी आपल्या आमदार आणि राज्य सभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या खासदार निधी मधून रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. 

      विकास आराखड्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात येत होते. या बांधकामामुळे रस्ता तयार करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कामासाठी केडीएमसीने अक्षम्य दुर्लक्ष होत होते,वर्षानुवर्ष तेच तेच वकिल महापालिकेच्या पॅनलवर आहेत परंतु कोर्टाकडून आदेश आणण्यासाठी कासवगतीने प्रयत्न चालू होते. याच काळात स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्या कडून २० लाखाचा खासदार निधी मिळवला होता. मात्र रस्ता होत नसल्याने मनसेच्या महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा दिपिका पेडणेकर यांनी यासंदर्भात आमदार पाटील यांना माहिती दिली. मनसे आमदार पाटील यांनी २५ लाख आमदार निधी दिला व पालिकेत पाठपुरावा करून अनधिकृत बांधकाम न्यायालयातून आदेश आणून निष्कासीत केला. अखेर हा रस्ता पुर्ण झाला आहे. केडीएमसीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची केडीएमसीकडून दखल देखील घेतली जात नसल्याचे मनसैनिकांचे म्हणणे आहे. मनसे आमदार पाटील यांनी हे काम हाती घेत पूर्णत्वास नेले आहे. त्यामुळे बालाजी गार्डन मधील नागरिकांनी मनसे आमदार पाटील यांचे आभार मानले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post