डोंबिवली ( शंकर जाधव) : गोरगरीब रुग्णांसाठी विशेष डॉक्टर्स आणि चांगले रुग्णालय मिळणे फार कठीण झाले आहे. रुग्णालयात आर्थिक प्रश्न त्रासदायक असल्याने रुग्णांना उपचार घेणे परवडत नाही. अश्या गोरगरीब नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे याकरिता ठा.म.पा.स्व.धर्मवीर आनंद दिघे हृद्यरोग उपचार केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा मातोश्री गंगुबाई संभाजी हॉस्पिटल व शिवसेना शाखा कोपरगाव /कोपररोड यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव येथील माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या शिवसेना शाखेत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, उपशहर प्रमुख त्रिवेणी अरुण म्हात्रे, विभाग प्रमुख हिरा वागेला, उपविभाग प्रमुख सपना प्रशांत शाह,उपशाखा प्रमुख वेदिका हनुमान म्हात्रे, कांता दीपक म्हात्रे, शाखा प्रमुख जयश्री सुरेश म्हात्रे,गटप्रमुख संजविनी मोहन गोरे, दीपा संपत कदम, शाखा प्रमुख अनिल बळीराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले, खर्चिक उपचार हे सर्वाना परवडणारे नसतात. हे शिबीर हे निवडणुका समोर ठेवून केले नाही. ज्यांच्या तपासणी नंतर ज्यांना रुग्णालयात कोणाला दाखल करण्याची गरज असेल अशांना रुग्णालयात दाखल करून मोफत उपचार केले जाईल. शिबिराच्या माध्यमातून कोपरवासीयांची आरोग्य चांगले राहावे यासाठी शिवसैनिकांनी अथक मेहतन घेतली. या शिबिरात ईसीजी, रॅडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन तपासणी करण्यात आली.
यात जनरल शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, एन्जीलास्टी शस्त्रक्रिया, अपेन्डीस शस्त्रक्रिया, हर्निया शस्त्रक्रिया, व्हेरिकोज शस्त्रक्रिया, गुडघा बदलणे शस्त्रक्रिया,आथोपेडीक शस्त्रक्रिया, मुल्व्याज शस्त्रक्रिया, क्रीटीकल केअर, मणक्याची शस्त्रक्रिया, कार्डियाक सर्जरी, जनरल मेडिसिन, युरी सर्जरी शस्त्रक्रिया, गायनंक शस्त्रक्रिया, न्युरीसर्जरी या शिबिराच्या माध्यमातून केली जाईल. शिबिरात यावेळी डॉ. पायल गुप्ता, डॉ. सुमन अडवलकर, डॉ. अमित पाटील यांनी तपासणी केली. दरम्यान डॉ,पायल गुप्ता म्हणाल्या. या शिबिरात मोठ्या प्रमाणात सांधेदुखीच्या रुग्णांची संख्या जास्त आढळली.