किचन नाविन्यतेमधील नवीन युगाचा शुभारंभ
मुंबई : लिव्हप्युअर या भारतातील आघाडीच्या होम व लिव्हिंग कंझ्युमर उत्पादन उत्पादक कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित चिमनी विभागाच्या लाँचची घोषणा केली आहे. चिमनीच्या सादरीकरणासह लिव्हप्युअर किचन क्षेत्रातील आपली उपस्थिती वाढवत आहे, तसेच ग्राहकांना त्यांचा कूकिंग अनुभव वाढवण्यासाठी आणि शुद्ध व आरोग्यदायी किचन वातावरणाला चालना देण्यासाठी विश्वसनीय, कार्यक्षम व स्टायलिश अप्लायन्सेस देत आहे. चिमनी विभाग १४ जुलैपासून फ्लिपकार्टवर (Flipkart) उपलब्ध असेल, ज्यामधून फ्लिपर्काटच्या व्यापक ग्राहकवर्गाला एकसंधी शॉपिंग अनुभव व देशव्यापी डिलिव्हरी सेवा देण्यात येईल. कंपनीची भविष्यात आधुनिक ट्रेड व जनरल ट्रेड चॅनेल्सपर्यंत चिमनी श्रेणी उपलब्ध करून देण्याची योजना आहे, ज्यामुळे देशभरातील ग्राहकांना अधिक प्रमाणात श्रेणी उपलब्ध होण्याची खात्री मिळेल.
ग्राहक-केंद्रित कंपनी लिव्हप्युअर नाविन्यतेच्या अग्रस्थानी असण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैलीकरिता सर्वांगीण सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी नेहमी प्रयत्न करते. कंपनीला बाजारपेठेत ब्रॅण्डेड चिमनींसाठी वाढती मागणी माहित आहे, ज्यामुळे या आर्थिक वर्षात वार्षिक १५ टक्क्यांच्या अपेक्षित विकास दरासह चिमनी विभाग २४०० कोटी रूपयांच्या मूल्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांची प्रथम पसंत असण्याप्रती ब्रॅण्डच्या कटिबद्धतेशी बांधील राहत लिव्हप्युअरचा चिमनी विभागात प्रवेश होणे स्वाभाविक आहे, ज्यासाठी त्यांच्या वॉटर प्युरिफायर्स व एअर कूलर्सच्या यशानंतर भारतीय घरांसाठी उच्च दर्जाची उपकरणे प्रदान करण्यामधील कंपनीच्या कौशल्याचा फायदा घेण्यात येत आहे.
या लाँचबाबत लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक राकेश कौल म्हणाले, ''आम्हाला फ्लिपकार्टवर लिव्हप्युअर चिमनी सादर करण्याचा आनंद होत आहे, यामधून ग्राहकांच्या स्वास्थ्यामध्ये वाढ करणारी अपवादात्मक उत्पादने प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. विस्तारित किचन क्षेत्रातील प्रवेशासह आमचा वॉटर प्युरिफायर्सच्या आमच्या विद्यमान श्रेणीशी पूरक शुद्ध व आरोग्यदायी कूकिंग वातावरण निर्माण करण्याचा मनसुबा आहे. आमच्या चिमनी ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजा व पसंतींशी संलग्न आहेत. आम्हाला विश्वास आहे की, या चिमनींची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये व उच्च दर्जाची कार्यक्षमता किचन जागेत स्वास्थ्यामध्ये वाढ करतील.''