कल्याण रेल्वे स्टेशनवर दारू पिऊन महिलेची छेडछाड




संतप्त झालेल्या महिलेने व प्रवाश्यानी छेड काढणाऱ्या तरुणाला दिला चोप

लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणाला घेतले ताब्यात

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

 कल्याण / शंकर जाधव :  कल्याण रेल्वे स्थानकावर वरील प्लेटफॉम् क्रमांक १ वर सायंकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी चालत जात असताना अचानक एका दारूच्या नशेत धुत असलेल्या माथेफिरूनेतिची छेड काढण्यास सुरवात केली महिलेने आधी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र त्या तरुणाने तिच्या सोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलाने आरडाओरडा करत तरुणाला विरोध करण्यास सुरवात केली मग काय संतप्त झालेल्या झालेल्या महिलेने व प्रवाश्यानी छेड काढणाऱ्या तरुणाला स्टेशनवरच चोप देण्यास सुरुवात केली लोकांची गर्दी पाहून स्टेशन परिसरात ग्रस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दारूच्या नशेत धुत असलेल्या तरुणाला ताब्यात घेत पुढील तपास करीत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post