डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना महामारीनंतर आर्थिक स्थितीने कंबरडे मोडल्याने सर्वसामान्य जनतेसाठी भाजपने मदतीला हात पुढे केला आहे. गगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य विकत घेण्यासाठी पैसा पुरत बसल्याने अश्या विद्यार्थ्यांना डोंबिवलीत भाजपच्या सर्व कार्यालयात मोफत वह्या वाटप करण्यात आले. डोंबिवली पश्चिमेला सम्राट हॉटेलजवळील भाजप जनसंपर्क कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे डोंबिवली पश्चिम पदाधिकारी हरीश जावकर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भरपावसात पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर डोंबिवली पश्चिमेकडील अंबिकानगर येथील भाजप कार्यालयात डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस समीर चिटणीस व पदाधिकाऱ्यांनीहि गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. गरीब विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हात असल्याने पालकवर्गांनी भाजपचे आभार मानले.