चारचाकी वाहनांची दुभाजकाला धडक

 


दुभाजक अपघातास कारणीभूत ...

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष..

डोंबिवली ( शंकर जाधव ) अनेक।वर्षांपासून डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकाजवळील एक छोट्या दुभाजक अपघटका कारणीभूत ठरले आहे.येथील जागरूक नागरिक रुस्तम पाटील यांनी अनेक वेळेला याबाबत प्रशासनला सांगण्याचा प्रयत्न केला. हा दुभाजक छोटा असल्याने याचा वाहनचालकांना गाडी वळवितांना अंदाज येत नाही. या जागेवर अनेक अपघात घडूनही वाहतूक पोलिसांनी व पालिका प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचा ओरड होत आहे.पुन्हा सोमवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी एका चारचाकी वाहन वळण घेत असताना या दुभाजलाला धडकली. या अपघात कोणीही जखमी झाले नसले तरी गाडीचे नुकसान झाले आहे.त्यामुळे लवकरात लवकर हा दुभाजक हटवावा अशी मागणी होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post