शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहर व रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या माध्यमातून
दिवा : शिवसेना (उद्धव बाaळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहर व रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या माध्यमातून सुभाष भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसंगी उपनेते व आमदार राजन साळवी यांनी शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी संपर्कप्रमुख, आमदार सुभाष भोईर साहेब, जिहाप्रमुख सदानंद थरवळ साहेब, सहसंपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण अरविंद बिरमोळे साहेब, युवानेते सुमित भोईर, युवासेना कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी, नगरसेविका अंकिता पाटील, उपशहरप्रमुख सचिन पाटील, युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, रोटरी क्लब ऑफ दिवाचे अध्यक्ष हर्षद भगत, सचिव आदित्य पाटील, महिला उपशहर संघटिका प्रियंका सावंत, योगिता नाईक, विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, मच्छिंद्रनाथ लाड, राजेश भोईर, उपशहर अधिकारी युवासेना अक्षय म्हात्रे, शहर सचिव उमेश राठोड, महिला विभाग संघटक स्मिता जाधव, उपविभाग संघटक विनया कदम पक्षाचे सर्व शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला आघाडी, शिवसैनिक, युवासैनिक, रोटरी क्लबचे सर्व सदस्य व दिवा शहरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक शाखाप्रमूख अनिकेत सावंत, उपशाखाप्रमुख विलास मुळम, उपशाखाप्रमुख दादा धाडवे, सोशल मीडिया समन्वयक विराज सुर्वे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
Tags
महाराष्ट्र