डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील रस्ता काँक्रीटीकरण कामे पूर्ण करून शाळेची बस व्यवस्थित रस्त्यावर धावू लागल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी शिवसेनेने आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लक्ष दिल्याने आम्ही सुखरूप शाळेत जाऊ शकतो असे शाळकरी विद्यार्थी म्हणाले.याबाबत अधिक माहिती देताना शिवसेनेचे विभगप्रमुख अमोल पाटील म्हणाले, डोंबिवली पूर्वेकडील संत नामदेव पथ मातोश्री पोळी भाजी केंद्र ते मानपाडा रोड कॉर्नरपर्यतचा रस्ता काँक्रीटकरणासाठी साडे सहा कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व एमएमआरडीएच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने उपलब्ध झाला.
सदर कामाचे काँक्रीटकरणाच्या पहिला टप्पा मातोश्री पोळी भाजी केंद्र ते गोग्रासवाडी गेट नंबर १ पर्यत पूर्ण झाला आहे. हा रोड नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्तावरून शाळेची बस व वाहने धावतात. त्यांना त्रास होऊ नये करता नागरिकांसाठी दुतर्फा भरणी करून ते लवेल करण्याचे सुरू आहे. सफाईचे कामही सुुरू आहे. शिवसेना लोकहिताची कामे करत आहेत.